रानफुलं
रानफुलं
1 min
27.4K
किती गोजिरी साजरी
राणी रानफुलं शोभे
फेटे बंधुनिया जणू
कुणी सरदार उभे।।१।।
रंग आगळे वेगळे
बघुनिया व्हावे दंग
दृष्टी सुखावते, मनी
उठे भावाचे तरंग।।२।।
गंध वेगळे वेगळे
गूण न्यारे प्रत्येकाचे
कुणी जहाल विषारी
नाही कुणाच्या कामाचे।।३।।
कुणी रामबाण दवा
बरे करती आजार
गर्दी करतात कोणी
जणू भरला बाजार।। ४।।
त्यांचे नशीबही कसे
नाही पूजेला चालत
कुणी प्रेयसी कधीही
नाही केसात घालत।।५।।
सारी ईश्वराची लीला
सारी त्याचीच निर्मिती
सृष्टी हिरवी नटली
रानफुलं शोभा देती।।६।।
