Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई

1 min
11.6K


सूर्यासारखा तेज असणारी मल्लिका , 

प्रत्येक कलेत प्रविण होती । 

तिला कुणाशी काय घेणं देणं , 

ती तर देशभक्तीत तल्लीन होती ।। 


ज्या वयात मुलं खेळतात, 

बाहुला बाहुलीचे खेळ । 

तेव्हा ती नानासोबत खेळायची, 

पट्टा, तलवार, चाकूचा खेळ ॥


नाना शिकत होते युध्दकला, 

तेव्हा ही लपून बघत होती ।

मोठया आतुरतेने तीही , 

युध्दकला शिकत होती ॥


महाराष्ट्राची देवी भवानी, 

कुलदैवत रानी चे होते । 

सैन्य घेरणे, दुर्ग तोडणे , 

हे तिचे तर खेळच होते ॥ 


तिचे ध्येय फिरंगी होते, 

तीचे अवतार देवीचे होते । 

तीला पाहून पुलकीत होते , 

वार तिच्या तलवारीचे होते ॥


तिच्या नावात शौर्य होते, 

कामात वीरता झळकत होती ।

पहिल्या स्वतंत्रता संग्रामात, 

कमान तिच्या हाती होती ॥


चमकली ती सत्तावनमध्ये, 

ती तलवार जुनीच होती । 

खुप लढली मर्दानी ती, 

झाशीची ती राणी होती ॥ 


Rate this content
Log in