रानमेवा
रानमेवा
1 min
12.4K
वडाचा पार गेला भरून
आजोबांनी करवंदांची टोपली आणली घरून
मिटक्या मारत मिठ लावत
आजी पण आली तरातरा धावत
फणसाचे गरे, बरका कापा
जांभळाची बी चवीने चाखा
खरबुज टरबूजाच्या करायच्या फोडी
मधल्या फोडीसाठी ताईदादाची भांडणं थोडी
टपोरा काजूगर मस्त मस्त
आंबा मात्र दिसता क्षणी होतो फस्त
नाही होत समाधान खाऊन आंबा
बाळगोपाळांना सांगावं लागतं अरे जरा थांबा
आई देते वाटीत आमरस भरून
बाबाही ताव मारतात चोरून चोरून
फळांचा हा रानमेवा
आंबा खाऊन भरपूर जेवा।।