STORYMIRROR

vishal lonari

Others

2  

vishal lonari

Others

रान

रान

1 min
3K


माझे दुखः न माझे राहिले

मन रडूनही अश्रू न वाहिले

धेय्याची वाट माझी चुकली

का माझे रस्ते हे भरकटले

 ठेवू कुणावर मी भरवसा

साऱ्यांचेच बोलणे साखरेचे

परि शब्दांपलीकडे असलेले

कडवटपण ही मी चाखले

साध्या साध्या गोष्टी माझ्या

हातातून निसटून गेल्या ...

होता होता राहिल्या काही

असेही दिवस मी पाहिले

बोचताय ते काटे, गंध नुरे फुलांना 

यश नाहीच का प्रयत्नांना

स्थिर जिथे जिथे नजर झाली

एकदम तिथेच सारे अंधारले

रंध्रात धावते अजूनही तेज-रक्तिमा

निश्चयाचे पीळ मी पुन्हा बांधले

धडधडेल पुन्हा तोफ माझी

जिद्दीने या मनी रान पेटले    


Rate this content
Log in