STORYMIRROR

Murari Deshpande

Others

3  

Murari Deshpande

Others

रामराज्य

रामराज्य

1 min
579


'रामराज्य' शब्द । अमर का झाला ।

सहजच आला । विचार मनी ॥


सुखाचा वर्षाव । प्रजेवरी असे ।

बंधुभाव वसे । खरोखर ॥


ठेविला आदर्श । शब्दां जागण्याचा ।

सत्ता त्यागण्याचा । क्षणार्धात ॥


खाउनिया बोरे । शबरीच्या हाती ।

फुलविली नाती । सर्वदूर ॥


पितृवचनाला । घेउनिया शिरी ।

गेले वनांतरी । काट्यातून ॥


जावो भले प्राण । वचन पाळीन ।

भला मी जाळीन । देह माझा ॥


आदर्श हा राजा । पुरुषोत्तम खरा ।

सुखावली धरा । पदस्पर्शे ॥


Rate this content
Log in