STORYMIRROR

Prashant Shinde

Others

1.7  

Prashant Shinde

Others

रामकृष्णहरी..!

रामकृष्णहरी..!

1 min
661


रामकृष्ण हरी । जप हा जपला।

देह हा खपला । भक्ती पायी ।।


राम नाही मनी । कृष्ण नाही जनीं ।

फिरे रानो रानी । भेटीसाठी ।।


हरी म्हणे राजा । किती तू रे भोळा ।

नको कर्म गोळा । मजसाठी ।।


प्रेमाचा भुकेला । फक्त तुझ्यासाठी ।

आला जगजेठी । धावोनिया ।।


पहा डोकावून ।तुझ्या अंतरात ।

मी रे हृदयात । वसतसे ।।


झाली मज जाण । देखून श्रीरंग ।

झालोया मी दंग । पाहोनिया ।।


Rate this content
Log in