STORYMIRROR

Savita Kale

Inspirational

4  

Savita Kale

Inspirational

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज

1 min
59

लोककल्याणाचा घेतला वसा

राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा।। धृ।। 


कलंक अस्पृश्यतेचा मिटवण्यासाठी

समतेचे राज्य तुम्ही निर्मिले

नोकरीत मिळवून दिले आरक्षण

सन्मानाने जगण्यास शिकवले

ध्यास समतेचा हा घेतला असा

राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा।। १।। 


बळीराजाचे राज्य यावे म्हणूनी

बाजारपेठा वसवल्या कैक शहरी

शेतकरी संघाची करून स्थापना

शेतकऱ्यांना दिली ओळख खरी

पोशिंदा जगाचा सुखावला असा

राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा।। २।। 


स्त्री शिक्षणाचा केला प्रसार

स्त्रियांना दिला जगण्याचा अधिकार

विधवाविवाहाचा करून कायदा

अबला स्त्रियांचा केला उद्धार

समाज परिवर्तनाचा दिला वारसा

राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा।। ३।। 


संस्कृती संरक्षणाचे महत्त्व जाणुनी

प्रोत्साहन दिले लोककलेला

कलागुणांची करून जोपासना

कलावंतांना राजाश्रय दिला

गुण ग्राहक राजा जगी ना दुजा

राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा।। ४।। 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational