राजभाषा
राजभाषा
1 min
792
नशिबानं भाग्य आले
मराठीचे ज्ञान मिळाले
भाषेचे महत्व कळाले
तिथून आम्ही मोठे झालो
मातीचा सुंगध दरवळला
शब्दांचा हा गंध पसरला
वेगवेगळ्या बोलीमधूनी
मराठीचा कोष वाढला
मराठीच्या बोलीतुनी
गोडवा मिळतो सर्वांना
आपले करते मराठी
दुसऱ्या बोली भाषांना
मराठीचा करतो गर्व
गोड आमची मायबोली
मराठीचा करा सन्मान
मराठीचा आपला मान
