राजाराणीच्या जोडीला
राजाराणीच्या जोडीला
अस वाटत सतत तुझ्याशी बोलाव, बोलताना हळूच थोड पहावं.
सहवास असावा कायम तूझाच, या वेळेलाही भान असावं.
थोडीशी मस्करी थोडा गोडवा, कधीतरी थोड रूसाव.
मनवताना तूझ्या रुसव्याला, बाजूला कोणीच नसावं.
तूझ्या आणी तूझ्याच आठवणीत, मन माझ सतत फसाव.
मनातल्या मनात एकट्यानेच, थोडस का होईना हसावं.
तसा हल्ली हसतो निरंतर, सगळेच कारन विचारतात.
नंतर लाजलो की, विलक्षण चमक अस पाहतात.
काहीही असो पण, ही वेळ खुप अप्रतिम आहे.
सतत काय ती घाई गडबड, फक्त काहूर माजला आहे.
बहोत काय ते लिहिणे अस म्हणून, शेवटी माझीच लेखनी थकते.
काय तूझ वर्णन करनार, जिथे बुद्धीच जागेवर नसते.
खास होतीस आणी आहेसच तू, आजच्या या घडीला.
साथ तुझी मिळाली, तेव्हा शोभा आली या राजाराणीच्या जोडीला.