राजा राणीच्या जोडीला
राजा राणीच्या जोडीला


चल माग बस राणी, बग चालवीतो गाडी.
गाव देव करू सारे, दर्शन जोडी जोडी.
जरा पदर सांभाळ, बगतात सारे तुला.
थोड अलगद बग चोरून, बर वाटल मग मला.
कारन हुडक शेलक, बुद्धीचा लाव जरा कस.
अशी लाजत लाजत, जरा जवळ येऊन बस.
जरा वाटल वेगळ, सगळं आहे जस नवं.
आज आलोया जवळ, जरा रूप तूझ दावं.
एक झालो असे आज, जन्मा जन्माच्या या गाठी.
तूझ्या दुःखाचं ग ओझ, बघ घेईल माझ्या पाठी.
चंद्रा वाणी रूप तूझ, आज न्याहाळतो तुला.
एकटाच हसतोय, काय होतय माझ मला.