राधा
राधा
1 min
252
राधा गौळण आली सजुन
पाही वाट पंढरीस जाऊन
टाळ मृदंगा चा चाले गजर
दिंड्या पताका वैष्णव जागर
विठ्ठल नामाचा दाटे महापुर
चन्द्र भागा काठी बसली रुसुन
वाळवंटी आले झड वारकरी
स्नान करुनी नाम भाळावरी
सजल्या पताका रुळे खांद्यावरी
पाही राधा नयनी निरखुनी
अवचित आला तिथे वासुदेव
नमस्कार करिती भक्त सदैव
भाळी मोरपीस सांगु लागला भाव
बावरली राधा अश्रु आले नयनी
अलगद तिला दिसला तोच शेला
कटीत टी होता सुवर्ण मेखला
कटी वरचा पावा गेला सांगुनी
विसावली राधा प्रेमे अलिंगनी
