पुस्तक
पुस्तक


उन्हाळ्याच्या सुट्टीतच काम करायचे असते ओव्हर
पुस्तकांना घालायचे असते तपकिरी कव्हर
पुस्तक वाचले जर
तर ज्ञानात पडते भर
वाचाल तर वाचाल
आणि तरच लिखाणही सुधाराल
परीक्षेच्या काळात करत होतो रात्रभर जागरण
अख्खे पुस्तक वाचले की वाटायचे जिंकले रण
पुस्तकाचे पूजन करतो दसऱ्याला
चांगली बुद्धी दे म्हणतो विद्येच्या देवतेला
जुनी पुस्तके रद्दीत द्यायला यायचे जीवावर
आठवण म्हणून ठेवली जायची हळूच माळ्यावर
लायब्ररीत उघडलं मी तेवढ्यासाठी खातं
पुस्तकांबरोबर जपण्यासाठी जन्मभर घट्ट नातं