पुर्ण विराम
पुर्ण विराम


आज असा तू शांतच झाला, पुन्हा कधी उठणार.
आमच्यातून गेलास नक्कीच, हे आता तर नाही पटणार.
काय कष्यामुळे, होत्याचे नव्हते झाले.
वाट पाहणारे, आज अचानक वाहत गेले.
सगळे तुटलेत, तूझ्या अचानक जाण्याने.
किंमत ओळखली होती, त्याच आपल्या नाण्याने.
तूझा चेहरा आवाज आणी हसणं, सतत समोर ऊभा राहतेय.
तू दिसतोस शेवटचा, पण नजर तुझी सावली शोधतेय.
हरवलास कायमचा असा, पुन्हा कधी ना मिळण्यासाठी.
हूरहूर मनाला लागली, पुन्हा तुला पाहण्यासाठी.
तू शांत होतास, पण खरा आज शांत झाला.
आठवणीने वेडा सारा, आज प्रांत झाला.
ऐकून बातमी तुझी, मन सुन्न आणी बधीर झाले कर्ण.
असा कसा अघटीत केला, आयुष्याचा विराम पुर्ण.