STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

पुनर्जन्म

पुनर्जन्म

1 min
13.3K



पुनर्जन्मावर काय बोलावे

सारे तर सांगून झाले

निव्वळ काथ्याकूट सारा

वाटले एरंडाचे गुऱ्हाळ बरे


कोण म्हणतो जन्म आहे

कोण म्हणतो जन्म नाही

सांगायला कोणी अनुभवी

परतून कधी येत नाही


तरी पण विचार मंथन

अखंडपणे चालू आहे

पुनर्जन्माचे दुकान

अजूनही शाबूत आहे


नाही आहे त्या द्वंद्वात

पडून माथेफोड करण्यापेक्षा

या जन्मावरच विश्वास

एकदाचा ठेवलेला बरा


हाच जन्म आहे खरा

जगा जगू द्या आणि

आनंदाने जीवन उज्वल उन्नत बनवा

कशास हवा रे पुनर्जन्म नवा


इथेच साक्ष आणि इथेच मोक्ष

पाहू सारे जीवन भरुनी अक्ष

जीवनात आता एकचि लक्ष

झुगारुनी टाकूया विचार रुक्ष


आनंद देऊ आनंद घेऊ

आनंदातच सारे जीवन सारू

नकारात्मकतेच्या विचारांवर

कुरघोडी करुनि दुर्दैवाला टांग मारू...!!!




Rate this content
Log in