पुण्यश्लोक
पुण्यश्लोक
आई अहिल्या तुझ्या कृपेने तारसी स्त्रियांना
अगाध करणी तूच सम्राज्ञी गर्दी देवळांना
देवी कृपा तुझी, स्त्रीयांवरी, जग्न्माता तूच राणी
आज गोंधळाला ये .
गोंधळ मांडला राजमाता गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग राणी गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
हातात घेऊनी ज्योतिलिंग मनात बांधीला चंग
राऊळी कीर्तने तुला गं आवडी, शोभतो यज्ञकुंड
होळकरांच्या घराण्यातून आली तूच लोकमाता
प्रेम दाटून येई तुझे, यात्रेकरु ते येता
आई कृपा केली, धनगरावरी आनंदली सृष्टी सारी
आज गोंधळाला ये .
गोंधळ मांडला क्रांतीआई गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग शांताई गोंधळा ला ये
उधं उधं उधं उधं उधं
दरबार भरवीला अखंड पाळीला दंडक न्यायाचा
शत्रुस लोळवूनी,बांधिले घाट, आदर्श माणुसकीचा
धर्मा जागुनि कर्म केले गाई दाना ला
वाटसरूं हे विश्रांती पावती पाहूनी अमराई ला
पुण्यश्लोक आई वात्सल्याने तारी
धावत ये लौकरी
आई गोंधळा ला ये
गोंधळ मांडला रणरागिनी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग माते गोंधळाला ये
आहिल्यादेवीचा उधं उधं उधं उधं उधं
बोल वीरकर मातेचा उधं उधं उधं उधं उधं
पुण्यश्लोक आईचा उधं उधं उधं उधं उध
