पत्रकार दिन...!
पत्रकार दिन...!
1 min
1.6K
सर्व पत्रकारांना
पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
पत्रकार दिनाच्या
शुभेच्छा देण्याला
सारेच जण येतात
चहा पान घेऊन
गोड गोड बोलून
घरी निघून जातात
चौथा की पाचवा खांब
हे त्या लोकशाहीलाच माहीत
खरेच ताकद नाही का उरली आमच्या शाईत..?
जो तो येतो अक्कल शिकवून जातो
खरेच का कोणी
आमची कदर करतो...?
प्रश्न मोठा गंभीर आहे
हे तुम्हा आम्हाला माहीत आहे
तरी पण उत्तराचीवास टिकून आहे
एक राजकर्ता
असा आम्हाला लाभावा
सारा क्लेश जीवनाचा दूर व्हावा
या पत्रकार दिनाच्या निमित्ताने
मागणे एकची आहे देवा
कोणा नको वाटू दे रे आमच्या लेखणीचा हेवा...!
