पर्यावरण
पर्यावरण
1 min
227
झाला मानवाला गर्व
श्रेष्ठ त्रिभुवनामधी
निसर्गाला मी जिंकले
गर्व दाटे मनामधी
जंगलांची केली तोड
घरे बांधी गिरीवनी
सृष्टी झालीसे उजाड
वृक्ष दिसेनात वनी
राजा वरुण कोपला
दुष्काळाचे ये सावट
पीकपाणी नसे रानी
कृषीवल भयभीत
झाला संंकटे सजग
झाडे लाविली तयाने
वरुणाची होई कृपा
हिरवाई चहूकडे
समतोल राखा सारे
पर्यावरणाचा जगी
पीकपाणी मुबलक
आता होई आबादानी
