STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

पर्यावरण संरक्षण

पर्यावरण संरक्षण

1 min
104


ईश्वराची सुंदर देणं

अद्भुत, प्रफुल्लित पर्यावरण

कुशीत पर्यावरणाच्या नांदती

मानव, पशुपक्षी सारेजण।। १।। 


अभिलाषा जिज्ञासा मानवी

हस्तक्षेप पर्यावरणात करी

निसर्गाचे बिघडले संतुलन

प्रदूषण वाढले पृथ्वीवरी।। २।। 


अशुद्ध हवेत श्वास घेण्यास

मानव मजबूर झाला आहे

विविध आजारांनी आज

बहू त्रस्त तो झाला आहे।। ३।। 


एक वेळ अशी येईल

मानवी जीवन असंभव होईल

दूषित पर्यावरणामध्ये

श्वास त्याचा गुदमरून जाईल।। ४।। 


पर्यावरणाचे रक्षण करण्या

करूया आपण प्रयत्न

पृथ्वीला वाचवण्याची

जबाबदारी स्विकारू सारेजण।। ५।। 


प्रदूषण विरहित पर्यावरणावर

आपले जीवन आहे निर्भर

एकत्र मिळुनी आता आपण

करू पर्यावरण संरक्षणाचा जागर।। ६।। 


Rate this content
Log in