प्रवास....!
प्रवास....!
1 min
285
तुझ्या डोळ्यांची जादू
सारी दुनिया पहात होती
उगाचच वेडे वेड्यासारखी
घायाळ होत होती
नव्हतेच काहीही डोळ्यात
सारे गुपित दडविलेस तू अंतरात
कळले नाही कुणाला
तू वरलेस मज त्या क्षणाला
मी थिजलो भिजलो चिंब झालो
आणि नजरेतून हृदयात पोहोचलो
म्हंटले वाचलो रे एकदाचा देवा
करत होती रे अनेक जण हेवा
सहजी सुखावूनी अंतरात
हलकेच प्रयाण केले निमिषात
परत फिरणे ना झाले कधी
विरलो सखे मी तिमिरात.....!!!!