प्रवास
प्रवास
1 min
376
प्रवास करावा मजेत
अगदी हसतखेळत
दिनक्रम विसरत
मौजमजा करत
बरोबर बहिण भावंडे
आत्या मामी काकी
खाण्याचीही चंगळ
सवे गाणी गप्पा गोष्टी
असा प्रवास नेहमीच
मन उल्हसित करतो
निसर्गसौंदर्याबरोबर
मनही उजळवितो
