प्रत्येक वेळेस मीच माझे मला
प्रत्येक वेळेस मीच माझे मला


प्रत्येक वेळेस नव्याने समजत चाललेली मीच माझी मला..
का कोण जाणे दुर जावे या जगापासून असे वाटे मला..
प्रत्येक वेळेस नव्याने भेटत चाललेले हे जग मला
का कोण जाणे खुप परके वाटे या जगापासून मला..
प्रत्येक वेळेस भेटेन नव्याने मीच माझी मला
का कोण जाणे मीच वाटे परकी माझी मला..
प्रत्येक वेळेस वेगळी तु असावी ही ओळख माझी मला
का कोण जाणे ही वेगळी ओळखच
परकी वाटे माझी मला..
प्रत्येक वेळेस तु भेटशील जुनी नाती घेऊन नव्याने माझी मला
का कोण जाणे दुर जावे या नात्यापासुन हेच योग्य वाटे मला..
प्रत्येक वेळेस तु दुर नको जाऊस असं सांगणारी माझी आजी मला
का कोण जाणे तीच दुर का लोटली मला..
प्रत्येक वेळेस नव्याने पडत चाललेली स्वप्ने माझी मला
का कोण जाणे नको ही स्वप्ने असे वाटे मला..
प्रत्येक वेळेस तु घेशील नव्याने झेप
या उंच आकाशी असे वाटे मला का कोण जाणे..
साथ मिळेल माझी मलाच..असे वाटे मला..