प्रत्यारोप
प्रत्यारोप
1 min
251
आरोप प्रत्यारोप आहेत जुळी
एकमेकांवर दिसतो प्रभाव
विश्वासाने जुळवून घ्यावे बंध
दिसू नये प्रेमाचा अभाव
आरोप झालेत की प्रत्यारोप होणारचं
गैरसमजाचा आहे व्यापार
नातेसंबंध सुदृढ करावे
नाही व्हावा कुणाच्याही नावाचा वापर
प्रत्यारोपातुन जन्मतो अविश्वास
वैऱ्यांगत पाण्यात पाहती
तुटती मनाच्या कोवळ्या भिंती
नाती साता समुद्रापार जाती
प्रत्यारोपाने जगणे बेहाल
प्रत्यारोप कुणावर करू नये
आरोपांची चामडी सोलता
सकलजणांची मने तोडू नये
नालंदा वानखेडे, नागपूर
