प्रतिक्रिया...!
प्रतिक्रिया...!
1 min
14.7K
नटूनी थटूनी बसल्या
नणंद भावजय भगिनी जोशात
काहीतरी सांगावे वाटले
पाहुनी तोरा त्यांच्या कानात
प्रत्येकीचा भाव वेगळा
फोटोचा मांडता सोहळा
देऊनी जणू आवळा
आठवणींचा काढती कोहळा
नाते विसरून परस्परांचे
एकरूप होती मनात
नजर ठेवुनी भिंगावरी
जीव ओतती कॅमेऱ्यात
स्माईल वन टू थ्री
झाले क्षणात सारे फ्री
लावले जणू आठवणींचे ट्री
विलसली साक्षात नजरेत श्री
आनंदाची आठवण ही
सदैव प्रतिमेत बंदिस्त झाली
पहा कशी उमटली आठवणीने
गालावरती पाहुनी प्रेमाश्रू मागे खळी....!
