प्रतिक्रिया ...!
प्रतिक्रिया ...!
प्र भात समयी दिले निवेदन
ती एक इच्छा मनात ठेवून
क्रि या फलद्रुप होईल वाटले
या च जन्मी पण इच्छित
प्रतिक्रिया अजून तरी
काही मिळाली नाही...
शब्द वेडा मी ही काही
अजून तरी काही थकलो नाही
वाळूत पाणी ओतणे
म्हणजे काय हे मी जाणतो
म्हणून तर जरा लेखणीला
आंदोलनास थोडं बसवतो
वाळल्या बरोबर ओळ जळत
तस प्रतिक्रिये वाचून मन खट्टू होत
आराम हराम म्हणतात खर
पण थोड थांबलेलं बरं.....
काय होत
कधी कधी अजीर्ण होत
मन ही मग विदीर्ण होत
आतल्या आत घुसमटतं
माये पोटी काळीज फाटतं
भावनांचं कल्लोळ माजतं
काहीतरी लिहिण्यास मग
मन धजत आणि प्रेम अश्रूंनी भिजत
ते कोणाला कोठे दिसतं
म्हणून तर कवी मनाला
थोडं वाईट वाटतं....!!!
