प्रसिद्धीची हाव..!
प्रसिद्धीची हाव..!
काही काही लोकांना
प्रसिद्धीची हाव असते
त्या मुळे त्यांचे एक
वेगळे वसलेले गाव असते
बेडका सारखे त्यांचे
डराव डराव करणे चालू असते
त्या डरकावण्यातच त्यांना
धन्यता सदा वाटत असते
नाचता येईना आंगण वाकडे
विचार अस्यांचे सदा तोकडे
तरीही सजविती त्यांना फाकडे
वाजवूनी डंका बळेच चोहीकडे
कोणाचे न्यून कोणी कधीच
कोत्या बुद्धीने पाहू नये
ज्याच्या त्याच्या बुद्धीचा तो स्वामी
त्याच्या बुद्धीला कोणी तोलू नये
कवी असतो कवी मनाचा
स्वभाव त्याचा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा
स्वर्ग मिळो अथवा नरक मिळो
जो तो ज्याच्या त्याच्या भाग्याचा
हाव प्रसिद्धीची असली तरी
टांगड्यात तांगडे कधी घालू नये
लेकी बोले सुने लागे
असे कधी वागू नये
सरळ निर्मळ प्रांजळ काव्य
ज्याचा त्याचा तो अधीकार आहे
त्या अधिकाराची पायमल्ली करून
कोणी कोणाची खिल्ली उडू नये
ग्रुप असो वा समाज असो
स्वबुद्धीनेच जीवन जगत असतो
ह्याचे ज्याला भान असते
तोच खरा जातीवन्त कवी असतो
पैसा अडका मान मरातब
नावलौकिक अन प्रसिद्धी सारे
जरी वरकरणी वाटले प्रेमाचे
तेच खरे अडसर या प्रवासातले....!!!
