पऱ्या.....
पऱ्या.....
1 min
230
स्वप्नातील पऱ्यांनो वास्तवात या
परिकथांना अस्तित्वात न्या
नाजूक पंखांवर किती
पेलणार झोपेचे ओझे?
हळूच उशाशी ठेवून जा...
मग नाही बोलणार तुम्हाला
स्वप्नांसाठी निजवायला...
पापण्या जड झाल्या की
मिटतील डोळे आपोआप
चिमुकले पंख पसरून उडून जा...
सप्तरंगी कमान ठेवा
मोहक फुलांचा साज लेवा
गुलाबी रंगात भिजवून
प्रेमाचे वाण द्या...
स्वप्ने सारी सत्यात उतरवून जा...
