प्रॉमिस डे अभंग..!
प्रॉमिस डे अभंग..!
प्रॉमिस डे माझा।वचन नामा हा।
देतोय ना पहा। सावरुन।।
शब्दांची किमया।वचनात आहे।
तुला देतो आहे।आलिंगुनी।।
प्रेम माय माझे।तुज्यावरी खास।
शब्दांची ही रास।तुझ्यासाठी।।
शब्द शब्द एक।सत्य ची आहे ग।
समजावून घे।झडकरी।।
वेळ ही दुर्लभ।आली अनायसे।
वाटले हायसे।पाहोनिया।।
मी तुझा तू माझी।झाले ग जुनाट।
पोकळ पुचाट।अविर्भाव।।
साथीस ही साथ।बरोबरीची ग।
देणार काय ग।सांग मला।।
वचन फुकट।नाही मी देणार।
कधी ही माघार ।नको मला।।
सांग लवकर।देऊ का वचन।
जन्मभराच्या ह्या।साथी साठी।।
लाजेल उगाच।म्हणेन काहीही।
फसूने कोणीही।जीवनात।
प्रलोभने अशी।रस्त्यात अनेक।
खूणगाठ एक।विश्वासाची।।
जाणून घेऊन।वचन हे द्यावे।
प्रेमसाठी घ्यावे ।समजून।।
दोंघांचा विचार।दोघांनी करावा।
वाचनाचा मार्ग।मगच धरावा।।
वचन अमृत।वचन प्रॉमिस।
सत्य हमखास। सत्यापोटी।।
सत्य हे शाश्वत।प्रेम हे अमर।
लिन हे पामर।प्रेमापायी।।
