prompt ४ कागदी विमान.
prompt ४ कागदी विमान.


विमान रॉकेट कागदाचे करूनी उडविणे बालपणीचे.
विरंगुळा अन् खेळ असे, वेडच आकाशी भरारी चे (१).
बालक झाले तरुण आता,खऱ्या विमानी बसुनी जाती.
परदेशी कौशल्य विकास करून तेथे सुखी नांदती(२).
बदलून गेले सर्व अचानक,जगभर करॉना चे थैमान.
त्यातून सुटका करण्यासाठी,तिथून सुटावे शक्कल छान (३). &nbs
p;
सौख्य सारी विपुल संपदा,भुलून गेले. ते परदेशी.
आठवला मग देश आपुला,पळून आले पुन्हा स्वदेशी (४).
करमणुकीचा,आनंदाचा,बालपणीचा खेल गमतीचा.
परी जीवावर येता संकट, गंमत झाला... मार्ग परतीचा (५).