promp 2 वसंत फुलतो
promp 2 वसंत फुलतो


प्रतिबिंब ते मीच पाहतो तुझ्या नेत्रीच्या.
जलाशयात.
परी उमटते तुझीच प्रतिमा
प्रीत भारल्या या कलिजात ! .
नव्हेत त्या गे तुझ्या.
पापण्या काठा वरली ती तृण पाती.
नयनी प्रितीच्या लहरी उठता सहज.
किती त्या थरथरती.
पंख स्पर्श मी हळूच
करता मौज वाटते
ग भिजण्यात (१).
श्र्वसातील चंद्रमा केशरी जलाशयाला बिलगून ग.
स्वप्न कमल ते घेई खुडूनी भ्रमर करीतसे गुंजन ग. .
वसंत फुलतो मनात आणि सुगंध येतो.
या जगण्यात (२).