STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

परंपरा

परंपरा

1 min
22.2K


रंग वेगळे, गंध वेगळे

वेषभूशा, बोलीभाषा वेगळी

राहणीमान, खानपान वेगळे

जाती, धर्म वेगळे

रीतीरिवाजही वेगळे


तरीही

एवढ्या विविधतेतही

आम्ही भारतीय आहोत

भारतीय म्हणूनच एकत्र राहतो

हीच आमची परंपरा!

जगात सर्वश्रेष्ठ परंपरा!


वडीलधाऱ्यांचा, साधुसंतांचा,

ऋषीमुनींचा, महिलांचा आदर

वृक्ष, वेली, पशू, पक्षी, शेजारी

एवढेच काय शत्रूंशी सुद्धा

प्रेमाने वागणे

हीच आमची परंपरा

वैदिक परंपरा!

ऋषींची परंपरा!


आज आमच्या अज्ञानामुळे

परंपरांमध्ये घुसलाय कचरा

त्याचा करावा लागेल निचरा

खोबरे जाऊन करवंटीच


हाती शिल्लक उरली

त्या परंपरांना सोडून नाही

तर त्यांचा अभ्यास करून

कचरा दूर करू!


पुन्हा जगात सर्वश्रेष्ठ अशी

भारतीय वैदिक परंपरा उभी करू!

त्या साठी कटिबद्ध

होण्याची ही वेळ आहे!

कुणीतरी पुढे होऊन

तिचे मूळ रूप साकारतो

हीच आहे इथली परंपरा!


Rate this content
Log in