STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

परंपरा

परंपरा

1 min
14.4K


परंपरा

म्हणजेच रूढी, चालीराती

चालत आल्या पूर्वापार

काही इष्ट तर

काही अनिष्ट ,

खुपच दुष्ट,जाचक.


ज्या चांगल्या त्या घ्याव्या

बाकी सोडाव्या.


परंपरा

खुपशा उत्तमच

ज्याला वैज्ञानिक आधार

आरोग्यासाठी त्यांचे

मानावे आभार.


तुळस असावी अंगणात

प्राणवायू मिळेल जास्त प्रमाणात

चरणस्पर्श वडीलधाऱ्यांचा

मेंदूला पुरवठा रक्ताचा.


स्त्रियांनी घालावे दागिने

निरोगी आरोग्याकारणे.

पारंपारिक सणवार

करावेत साजरे

आनंदाने एकत्र येतात सारे.


ऋतू आणि हवामान

यांना परंपरेत स्थान.

अशा अनेक रूढी

वर्णाव्या मी किती!

विज्ञानही गातो

अशा परंपरांची महती.


नाती जपावाया

पाळाव्या चालीराती

क्रूर जर का त्या

द्यावी मुठमाती.


समाज असेल सुधारणार

तर जाचक रूढी

कराव्या हद्दपार

कराव्या हद्दपार.


Rate this content
Log in