पर्जन्य
पर्जन्य
1 min
153
श्यामल घन भरून आले गगन
वाहून आले मोसमी तीव्र पवन
कृष्ण सांवली लोपले सूर्य दर्शन
नेत्रांस थंडावा मेघाचे आकर्षण
थेंबथेंब टपोरे ये धरतीवर
स्वागता आतुर अवघे चराचर
तेजधार कोसळे सचैल सघन
विध्वंसाच्या झोळीमध्ये नवचेतन
चाहूल मृगाची देई गंध मृदाचा
प्रतिक्षेत चातक वर्षाव जलाचा
