प्रिया आज माझी..!
प्रिया आज माझी..!
1 min
23.6K
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
सोडुनी गेली त्या काळी काया
पाहिल्या अनेक पोरी बाया
सोडिल्या ज्यांनी दुःखद छाया
जीवनात वाहत्या ओंडके अनेक
जणू लोडणे म्हशीच्या गळ्यातील एक
थडकले पायाशी अनेकदा
रक्त बंबाळ जखमा करुनि सुरेख
आठवणीत राहण्या खपली त्यांची
पडली नाही कधीच लवकर
मलमपट्टी कित्येकदा केली
बरी होण्या जखम भराभर
काळ ओघात जखम अश्वत्थाम्याची
ओघळताना खरच छान वाटलं
आठवणीच दुकान मनी थाटता
जखमेचा डाग पाहून बर वाटलं
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
असे म्हणावे कसे सांग छाया
कंठ दाटतो आजही ते गीत गाया
अतूट ग अशी वेगळीच आपली माया...!
