STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

प्रिय सांता...

प्रिय सांता...

1 min
3.7K


प्रिय सांता, ...


आज म्हणे तू गिफ्ट वाटत असतो.

जर माझ्या देशात गिफ्ट

वाटायला निघाला असशील तर ...

दे मोकळा श्वास

त्या गर्भातल्या कळ्यांना.

ज्या कुस्करल्या जातात उमलायच्या अगोदरच

आणि उमलल्यावर सुद्दा...


दे सदबुद्धी तिच्या जन्मदात्यांना.

जरा अक्कल सुध्दा दे

येथील उन्मत्त झालेल्या पुरुषांना..

जे दिवसाढवळ्या करतात लुटालूट

तिच्या अब्रूची

आणि देतात पेटवून तिच्यासोबतच

माणुसकीला सुध्दा.


देऊ झाले तर दे बळ ...

येथील शेतकऱ्यांना सुध्दा

दुष्काळाशी, नापिकीशी

आणि निगरगट्ट गेंड्याची कातडी पसरलेल्या शासनाशी

दोन हात करण्याचे.


प्रिय सांता,

तुझ्या धोपटीत घेऊनी ये

धेर्य, हिम्मत, साहस जिद्द आणि चिकाटी

येथील नवतरुणांसाठी.

ते गुरफटले जाताय नैराश्य,

उदासीनता, न्यूनगंड, बेरोजगारी,

आणि व्यसनात मोठ्या वेगाने.


दे गिफ्ट येथील प्रत्येक मानवाला

माणुसकीने संपन्न एक हृदय तू..

दे संजीवनी त्या आपुलकीच्या,

स्नेह आणि प्रेमाच्या झऱ्याला

जो प्रतिस्पर्धी, द्वेष, ईर्षा आणि

मत्सराच्या उन्हामुळे आटला आहे ....


प्रिय सांता देशील ना रे .



Rate this content
Log in