परिमल...
परिमल...

1 min

55
गंध कोवळा स्पर्शुन जातो
वारा अनामिक जेव्हा येतो
अंतरात काहूर उगीच सजतो
परिमल एक ओंजळीत रंगतो..१..
कळत नकळत दिशा दाही घुमतो
घननाद नभाच्या कुशीत वाजतो
बेधुंद आसमंत खुशीत हसतो
परिमल एक ओंजळीत रंगतो..२..
चातक तल्लीन ऊन्हात कर्मितो
मृगनयनी आशेस तृषार्त तृप्ततो
मेघगर्जना पाणेरी सोबत वाहतो
परिमल एक ओंजळीत रंगतो..३..
जीवन गीत गात मनुष्य जगतो
आहे ते सोडून हवे ते धुंडाळतो
अनुभव देता घेता शिकतो
तेव्हाच अन् तिथेच त्याच्या
परिमल एक ओंजळीत रंगतो...
तेव्हाच अन् तिथेच त्याच्या
परिमल एक ओंजळीत रंगतो..३..