प्रीतीगुज
प्रीतीगुज
गुज तुझे माझे सख्या
कसे ओठाआड दडे
सांगू कसे तुला प्रिया
लज्जा आड येई गडे (१)
गुज तुझे माझे रंगे
वनी जल उपवनी
येई फुलोरा प्रेमाचा
कारंजेच थुईथुई (२)
गुज तुझे माझे राजा
धुंद ओल्या वाटेवरी
हात हातात गुंफुनी
फिरे नजर मजवरी (३)
गुज तुझे माझे रानी
लता वृक्ष हिरवाई
फुले रंगीत सुगंधी
खुळी प्रीत गंधाळली (४)
गुज तुझे माझे हरी
सूर अलगुज रंगी
जसे एकरुप अंगी
तसे रंगू प्रेमरंगी (५)
गुज आपुले राजसा
रंगे सागरकिनारी
फेसाळत्या लाटांसवे
धुंद प्रीत फुले न्यारी (6)
नीलवर्ण रत्नाकर
चंद्रबिंब उगवले
खुले अपूर्व सोहळा
बंधमुक्त प्रीत फुले (७)
