STORYMIRROR

काव्य रजनी

Romance

3  

काव्य रजनी

Romance

प्रीत वेडी

प्रीत वेडी

1 min
11.9K

प्रीत वेडी माझी अशी

असेल जर प्राजक्त मी

घालीन कुंपण भावनांना

असतो प्रेमात त्याग

विसरेन मी आठवांना


प्रीत वेडी माझी अशी

नाही कळले प्रेम तुला

मी शब्दांतून मांडलेले

भावनांचे ते विलक्षण मोती

माझ्या हृदयातून सांडलेले...


प्रीत वेडी माझी अशी

विरह सोसवेना आता

करू कसा जीवन प्रवास

भावना किती दडून ठेवल्या

झाल्या आता त्याही भकास


प्रीत वेडी माझी अशी

तुजवरील प्रेमभावनेत

व्याकुळ झाली ही सजणी

अहोरात्र तुझ्याच आठवणीत

रममाण मी होते दिनरजनी


प्रीत वेडी माझी अशी

मन माझे तुझेच होते

अलगद ते आता कुठे हरवले

तुझ्या माझ्या भावना एकवटून

ओढ अनामिक माझी सावरले


प्रीत वेडी माझी अशी

तुझं माझं नातं म्हणजे

जणू काही दिया और बाती

दिव्याशिवाय ज्योतीची

अधुऱ्या प्रितीची नाती


प्रीत वेडी माझी अशी

तुझ्या प्रितीत ही ज्योत

किती आकंठ बुडाली

तुझ्यात हरवून गेली

प्रितवेडी प्रेमात झाली


प्रीत वेडी माझी अशी

डोळ्यात आज माझ्या

तुझीच छबी ही दिसते

सारखा तुझाच भास

भेटण्याची आस असते


प्रीत वेडी माझी अशी

आता अशा या वळणावर 

मला आणून सोडले

तुझ्या प्रेमाने सदा

काळीज कोलमडले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance