STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

प्रीत अनुभूती

प्रीत अनुभूती

1 min
40.9K



प्रेम म्हणू नका याला

श्रद्धा च ती माझी

व्यक्ती म्हणू नका त्याला

पूजिते मी मूर्ती

भुपाळीच्या स्वरांमध्ये

शृंगाररुपी राग

आस त्याच्या दर्शनाची

होतोय आज त्याग

घंट्यांच्या नादमधुर तालात

नाम जपते मी

जीवन संगीत आरतीचे

विणावेल सजविते मी

मागणे मागण्याआधी

तृप्त झालेय मन

प्रसाद मिळावे तुझे

प्रसन्न रुप आन

स्वार्थ म्हणू नका याला

गुलाबी माझी भक्ती

विनोद समजू नका याला

ही प्रीतच अनुभूती .


Rate this content
Log in