STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

2  

Manisha Wandhare

Others

परी...

परी...

1 min
3

परी तू स्वर्गातली गोड गोजिरी साजिरी ,

गुलाबी पाकळ्या ओठांच्या मिटे लाजिरी ...

काळेभोर रात्रीचा रंग लेवून उडे कुंतले ,

समुद्राचा फेस जणु तिने फासला तनुवरी ...

पिवळी कांती भासे जशी उषा कोवळी,

गालावरच्या खळी शोभा वाढवी बावरी ...

चाले अप्सरा भासे नागीनीची वळवळ,

वाऱ्यावर उडे पदर कल्लोळ माजवे सुंदरी ...

जिभेवर साखर विरघळवून बोले ,

स्वर हे इतके मधुर भूला लाभली माधुरी ...

मृगनयनी लोचनांची लकेर काळ्या ढगांची ,

मकरंद गुलाबाचा लाभली देणगी इश्वरी ...


Rate this content
Log in