प्रेमवेडा
प्रेमवेडा
हुरहुरत्या कोवळ्या मनी येते
प्रेम ही भावना फुलून..
या नाजूक भाववेलीवर
येतात प्रेमपाकळ्या उमलून..
फुलांच्या ताटव्यात हात
घालता काटा जातो रुतून..
आजच्या बेगडी प्रेमात खरं
जीवापाड प्रेम जाते वाहून..
स्वतःसाठी जगता-जगता
जातो आपण असच मरून..
कधीतरी दुसऱ्याच्या आनंद
प्रेमकरता पाहवं जगून..
मीसुद्धा एका मोहक फुलाला
हृदयात स्थान दिले पाहून..
तिला पाहण्या- भेटण्या- बोलण्याकरता
जगतोय झुरून झुरून..
तिच्या स्वीकृतीने मी
गेलोय तिच्यात गुंतून..
माझ्या खऱ्या प्रेमातील वेड्या
कृतींना पाहवे तिने आठवून..
का दुखवते ती मला
अशी अविवेकीपणे वागून..?
असं काय चुकतं की
बसते ती नेहमी फुगून..!
तिचा अबोला- दुरावा वाट
दाखवतो अश्रूंना करून..
तिची व तिच्या प्रेमाची
वाट पाहून गेलोय मी थकून..
जर टाकायच्याच होत्या तिला
माझ्या प्रेमभावना चिरडून..
तर कशाला द्यावा आसरा
तिने मला प्रेमपाखरू समजून..
थकलोय आता मी तिच्या
स्मृती-विरहाचा गोडवा चाखून..
माझ्या निशब्द प्रेमाची व प्रेमवेड्याची
किंमत केव्हा येईल तिला कळून..
तिच्या सहवासात जीवन जगण्याचे
स्वप्न पाहतोय मी अजून..
"मला तुझं प्रेम हवय" पाहतो
तिला पुन्हा एकदा सांगून..
