प्रेमाचं गुपितं
प्रेमाचं गुपितं
प्रेमाचं गुपित
सांगू नका कुणाला
प्रेम आहे नाही
विचार बिनधास्त तिला
होकार , नकार काहीही असो
प्रेमाचाच भाग ना ...
त्यात कसला द्वेष नि
कसला धरतोस राग
प्रेम होते नकळत
पण जाणून बुजून ...
प्रेमात व्हावं ओलंचिंब
प्रेमभंगानं जावं विझून ?
प्रेमातही असावी खिलाडूवृत्ती
तू नही तो और सही ...
कशाला हवी हत्या नि
कशाला करायची आत्महत्या ?
प्रेम असतं त्याग, समर्पण
प्रेमाने यावं आत्मभान ...
प्रेमभंगातूनही सावराव
पुन्हा खंबीरपणे उभं रहावं ...
प्रेम द्यावं , प्रेम घ्याव
प्रेम हे प्रेमानं मिळवावं ...
संयम कधी ढळू न द्यावा
प्रेम करावं निस्वार्थ , उदात्त
प्रेमाचं गुपितं ज्याला कळलं
तो जगी सर्व सुखी असे ...
प्रेमाची भाषा , प्रेमाची आशा
विखुरली सभोवताली दिसे ...
