प्रेम..!
प्रेम..!
दोनच शब्दांची
दोनच ओळींची
कविता
या तीन शब्दांसाठी
लिहायची होती
प्रेम या
दोन शब्दांसाठी
सारी दुनिया
वेडी झाली
आकाशाची पोकळी
कूच कामी ठरली
समुद्राची विशालता
कच खाल्ली
चंद्राची शीतलता
हाय खाल्ली
सूर्याची तपत्ता
कमी पडली
वाऱ्याची लय
क्षय ग्रस्थ झाली
पाण्याची निर्मलता
हाय मोकलून रडली
मायेची ममता
उफाळून आली
त्यागाची परिभाषाच
बदलून गेली
स्वार्थाची परिसीमा
शिगेला पोहचली
आणि म्हणे
प्रेम या दोन शब्दावर
दोन ओळीत कविता लिहा
मी म्हंटले
प्रे ता वरील
म मत्व म्हणजे प्रेम
धुनुष्यातून सुटलेला बाण म्हणजे प्रेम
विजेचा झटका म्हणजे प्रेम
आगीचा चटका म्हणजे प्रेम
जे जे माफी पात्र नाही ते ते प्रेम
प्रेम प्रेम असत अस म्हणतात
पण जे नसत तेच प्रेम असत....!!
