STORYMIRROR

Ravindra Gaikwad

Tragedy

3  

Ravindra Gaikwad

Tragedy

प्रेम आंधळं असतं

प्रेम आंधळं असतं

1 min
48


माझ्या चांगुलपणाचा तू पाहात होतीस अंत

तू मला ठार मारलं, मरतानाही माझी खंत


तुझ्या सुखापायी मी मला जाळीत होतो

ती चूक माझी होती, मी तुला कुरवाळीत होतो


तुझ्या सर्व सुखात, अडचण माझीच होती

ती अडचण दूर झाली, आता सुख तुला हे किती!


तुझ्या संगे किती मी स्वप्न पाहिले होते

ते स्वप्नच राहून गेले, अधुरेच स्वप्न ते


दारूच्याही वरची मज नशा तुझी गं होती

त्या दारूहुनही जास्तच तू केलीस माझी माती


गात फिरतोय रस्त्याने मी माझ्या बरबादीचे गीत

खरंच प्रेम आंधळं असतं, आंधळी असते प्रित...!


Rate this content
Log in