पोट
पोट
1 min
246
कोण नाचतो, कोण धावतो
कोण मारतो खडे,
कोण कोणाच्या हुलकावण्याने
कोण कापतो कोणाचे गळे
तोड-फोड यांचे कर्तव्य आणि
बंद यांचा हक्क आहे,
पोटा साठी केलेला हा एक
पार्ट टाईम जॉब आहे
गुण कोणाचे गात असतो
खाणे कोणाचे खात असतो,
आलेला दिवस घालवण्यासाठी
केलेला हा एक खटाटोप आहे