पोलिसांचे आयुष्य
पोलिसांचे आयुष्य

1 min

11.6K
काही लोक द्वेष करत तर काही लोक भ्रष्ट म्हणून मोकळी व्हायची,
खर सांगतो लोकहो तुमच्यासाठी लढायचो आम्ही भावना कधीच दृष्ट नसायची...
तुम्हाला मारताना आम्हालाही व्हायचा त्रास,
आम्ही ते करायचो जिवंत ठेवण्यासाठी तुमचा श्वास...
आम्हालाही कुटुंब आहे तरीही फिरतो वणवण,
कारण आम्ही जीवन देशाला केलय अर्पण...
आम्ही लढत राहतो अन आमचा कधी जीवही जातो,
बापाशिवाय जगण्याचं सामर्थ्य आमच्या लेकरासी देऊन जातो...
खरं सांगते लोक हो पोलीस होणं म्हणजे जीवन मरणाचा खेळ असतो,
कधी काय होईल याचा काही मेळ नसतो