पोलीस
पोलीस


पोलीस करतात
जनतेचे रक्षण
वाहून देतात
प्रत्येक क्षण
सण असो
की वार
असतात सदैव
कामासाठी तत्पर
आपत्तीच्या काळात
जास्तीची ड्युटी
मग कसली
आली सुट्टी
राहावे लागते
त्यांना कठोर
मानत नाहीत
हार लवकर
काहींना वाटतो
पोलिसांचा दरारा
आश्रितांना देतात
तेच सहारा
जनतेने राहावे
सतत जागरूक
घडू देवू
नये चूक