पोलीस यंत्रणा!!
पोलीस यंत्रणा!!


हात त्याचा हा कमरेवरती
प्रत्येक चौकात तो उभा आहे
चौकशी करतो, मारही देतो
पण मनाने अगदी भोळा आहे!!धृ!!
वैर नाही कोणासोबत पण
आपल्यासाठी तो झटत आहे
राहूया की थोडावेळ घरात बंद
त्यात आपलेच हित आहे!!१!!
याआधी होतो आपण
पण संकट एवढे क्रूर नव्हते
क्रूर होती माणसं पण
प्राण्यांना दोषी ठरवत होते!!२!!
मुक्यांचा काय जीव घेणार
बोलकेच प्राणघातक आहेत
प्राणापेक्षा धर्म आमुचा
मोठा यात काही शंका नाय!!३!!
मारतात तुम्ही त्यांना
ज्यांनी आपले रक्षण केले
लाज बाळगा कृतघ्न हो
ज्यांनी आपले जीवन जगविले!!५!!
आज ते आहेत
म्हणून आपण आहोत
ते आज नसतील तर
तर आपण कोणीही नसू!!६!!
संपूर्ण देश हा झगडतो आहे
प्राणरक्षकही सोबत आहेत
सरकारचे पूर्ण लक्ष हे
जनतेच्या रक्षणार्थ आहे!!७!!
सलाम करतो, सन्मान करतो
तुमच्या या कार्याला
प्रत्येक राज्याच्या, प्रत्येक देशाच्या
प्राणरक्षक तुम्हाला
फक्त पोलीस दादा तुम्हाला
प्राणरक्षक तुम्हाला
फक्त पोलीस दादा तुम्हाला!!८!!