STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

पंचवीस मार्च...!

पंचवीस मार्च...!

1 min
670


पहिला दिवस..!

आज गुढीपाडवा

आनंदाचा उत्साहाचा

मांगल्याचा अन्

वर्ष प्रतिपदेचा..

नवं वर्षाची सुरुवात झाली

पूजा अर्चा सुरळीत पार पडली

शुभेच्छा देऊन झाल्या

गप्पा ही खूप आप्तांसंगे रंगल्या...

गोडाधोडाचे जेवण झाले

चहा वरचे खाणेही झाले

संध्याकाळी गच्चीवरती आरामात

मस्तपैकी फिरणे पार पडले...

म्हंटले पहिला दिवस

आनंदात मजेत सरला

वेळही चांगला सत्कारणी लागला

बातम्यांनी जरा डोक्याचा भुगा केला

पण सय्यमासाठी नवा जोम दिला...

रात्री झोपी जाताना

मी दिवसाचा लेखाजोखा घेतला

म्हंटले आभारा साठी हात जोडू

आणि झोपण्या पूर्वी

हात धुण्याचा सोपस्कार पार पाडू...

हात धुताना मनात विचार आला

सारे कृष्णार्पण करू

आपण आपले आरोग्य सांभाळू

देश सेवेचे व्रत या क्षणापासून नित्य पाळू...

संकल्प केला मी आज

आंनदाने निद्राधीन होताना

पाहीन म्हंटले उद्याचा दिवस

देश सारा कोरोनामुक्त होताना....

तशी निद्रादेवी डोळ्यासमोर

हळूच हसून तरळून गेली

म्हणाली निश्चिन्त रहा बाळा

कोरोनाला लागतोय रे टाळा...

सकाळी उठून थोडा नित्य

प्रसन्न चित्ते व्यायाम अवश्य करा

सकस आहारासह आरोग्याचा

घरात राहूनच काळजीने सांभाळ करा...


Rate this content
Log in