पळसफुले
पळसफुले
1 min
1.1K
पळसफुले
लालबुंद दिसती
उन्हे हसती।
फुलांची नक्षी
निसर्ग नटलेला
छान सजला।
अंगणी शोभा
पुष्परूपी संभार
रंगाची आभा।
मन हरखे
किमया सृष्टीतली
डोळा पाहिली।
भर उन्हात
साऱ्यांना प्रसन्नता
उत्साह दाता।
