पळस
पळस
1 min
858
ऋतु शिशिर
हळू दिली चाहूल
सृष्टी बेहाल.
झाड पळसाचे
डोंगरात,घाटात
उभे थाटात.
निष्पर्ण जरी
लेतो फुलांचा साज
मोहवी आज.
चढली लाली
शोभे केशरी रंग
नटले अंग.
पळस राजा
कसा उन्हात शांत
किती निवांत!
ओसाड रानी
जणू मर्द रांगडा
जोशात खडा.
